भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी पुन्हा एकदा त्याच्या खालावलेल्या प्रकृतीमुळे चर्चेत आला आहे. विनोद कांबळी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील पालघरमधील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 21 डिसेंबरच्या रात्री कांबळी यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि नंतर देशांतर्गत क्रिकेटपासून दूर राहिल्याने कांबळी गेल्या दशकात अनेकदा आजारी पडला आहे. विनोद कांबळी गेल्या काही वर्षात कधी आजारी पडला, ते आजार कोणते?


आता नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनोद कांबळी यांना युरिन इन्फेक्शन झाल्याच सांगितलं जात आहे. पण आता प्रकृतीमध्ये सुधारणा आहे. विनोद कांबळी यांच्यावर आकृती रुग्णालयातील डॉक्टर उपचार करत आहेत. पण याआधी देखील विनोद कांबळी वेगवेगळ्या कारणांमुळे आजारी होते. ती कारणे कोणती? समजून घ्या. 


(हे पण वाचा - विनोद कांबळीची अचानक बिघडली तब्बेत; रुग्णालयात केलं दाखल) 


विनोद कांबळी कोणत्या आजारांनी ग्रस्त?


  • कांबळीने नुकतेच एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्याला लघवीचा त्रास होत आहे. त्यांनी सांगितले होते की, या वर्षी नोव्हेंबरमध्ये या समस्येमुळे ते अचानक खाली पडले आणि पायावर उभेही राहू शकले नाहीत, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • सुमारे 12 वर्षांपूर्वी कांबळीला त्याच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक अनुभवातून जावे लागले होते, जेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतरच त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली, ज्यामध्ये त्याचा मित्र आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरने त्याला मदत केली.

  • 2013 मध्ये तो आपल्या कारमधून मुंबईत कुठेतरी जात असताना अचानक त्याला गाडी चालवताना त्रास झाला आणि त्याने गाडी थांबवली. तेव्हा एका सतर्क वाहतूक पोलिसाने त्याला तेथे पाहिले आणि त्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल केले. यावेळीही कांबळीला हृदयविकाराचा झटका आला होता पण तो लवकरच बरा झाला.

  • याशिवाय त्याला नैराश्याशीही झगडावे लागले होते, ज्याचा खुलासा त्याने अनेकदा केला आहे. याशिवाय दारूच्या व्यसनामुळे ते अनेकवेळा आजारीही पडले, त्यामुळे त्यांना गेल्या काही वर्षांत सुमारे 14 वेळा पुनर्वसनासाठी वेळ द्यावा लागला.

  • या वर्षी ऑगस्टमध्येही कांबळी पुन्हा एकदा आजारी पडला, तेव्हा त्याला चालणे पूर्णपणे कठीण झाले होते. यादरम्यान त्यांचा एक व्हिडिओही समोर आला होता ज्यामध्ये तो पायावर उभाही राहू शकत नव्हता आणि लोकांच्या मदतीने तो कसा तरी चालत होता. मात्र, काही दिवसांनी तो बरा झाला.