मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक सचिन अ बिलियन ड्रीम्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. सचिन तेंडुलकरच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं असतानाच सचिनचा मित्र आणि खेळाडू विनोद कांबळीनं सचिनच्या आठवणींना उजाळा दिला आहे.


विनोद कांबळीनं ट्विटरवर सचिन तेंडुलकरबरोबरचा जुना फोटो शेअर केला आहे. डिअर मास्टर ब्लास्टर आय लव्ह यू, असं ट्विट विनोद कांबळीनं केलं आहे. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकरनं शारदाश्रम शाळेकडून खेळताना ६६४ रन्सची विक्रमी पार्टनरशीप केली होती. या मॅचमध्ये सचिननं ३२६ आणि विनोद कांबळीनं ३४९ रन्स केल्या होत्या.