T20 World Cup: ...अन् संतापलेल्या राशीद खानने आपल्याच सहकाऱ्याच्या अंगावर बॅट फेकली; VIDEO व्हायरल
टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तानने (Afghanistan) बांगलादेशचा (Bangladesh) पराभव केला आहे. दरम्यान या सामन्यात एका क्षणी राशीद खान (Rashid Khan) आपलाच सहकारी करीमवर प्रचंड संतापलेला दिसला. तो इतका संतापला होता की, बॅटच फेकून दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तानने (Afghanistan) बांगलादेशचा (Bangladesh) पराभव करत सेमी-फायनल गाठली आहे. यासह अफगाणिस्ताना संघाने इतिहास रचला आहे. सामना जिंकल्यानंतर अफगाणिस्तान संघाच्या खेळाडूंसह त्यांच्या चाहत्यांनाही अश्रू अनावर झाले होते. दरम्यान या हायव्होल्टेज सामन्यातील एक क्षण असा होता, ज्याची राशीद खानच्या मनातही खंत असेल. एका क्षणी राशीद खान (Rashid Khan) आपलाच सहकारी करीमवर प्रचंड संतापलेला दिसला. तो इतका संतापला होता की, बॅटच फेकून दिली.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाची स्थिती 93 धावांवर 5 गडी बाद होती. ओव्हर्स संपायला अद्याप 14 चेंडू शिल्लक होते. यामदरम्यान जेव्हा एका चेंडूवर 2 धावा काढणं शक्य असतानाही करीम दुसरी धाव धावला नाही. यामुळे संतापलेल्या राशीद खानने संतापाच्या भरात बॅट फेकून दिली.
19 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर हा प्रकार घडला. राशीदने टोलवलेला चेंडू कव्हरला गेला होता. यावेळी राशीदला दुसरी धावही मिळू शकते असं वाटत होतं. पण करीमने त्याला अर्ध्यातून माघारी पाठवलं. यानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार इतका संतापला की त्याने करीमच्या दिशेने बॅट फेकली.
राशीदचा संताप समजण्यासारखा होता कारण त्याने या चेंडूच्या आधी 2 षटकार लगावले होते आणि पुन्हा स्ट्राईकवर येण्यास उत्सुक होता. त्याच्या नशिबाने पुढच्याच चेंडूवर त्याला पुन्हा फलंदाजी मिळाली आणि त्याने तिसरा षटकार लगावला.
राशीद खानने 10 चेंडूत 19 धावा ठोकत संघाला 115 धावसंख्येपर्यंत मजल मारण्यास मदत केली. यामुळे अफगाणिस्तान संघाने बांगलादेशसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात मदत केली. यामुळेच अफगाणिस्ताना संघाला बांगलादेशचा पराभव करत सेमी-फायनल गाठली.
अफगाणिस्तान संघाला सेमी-फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सामना जिंकणं गरजेचं होतं. बांगलादेश संघ हा सामना जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. पण राशीद खानने फलंदाजीनंतर गोलंदाजीनेही सामन्याचं चित्र पालटलं. राशीद खानने बांगलादेशची चौथी, पाचवी, सहावी आणि सातवी विकेट काढत बांगलादेश संघाची विजयाच्या दिशेने निघालेली ट्रेन रुळावरुन खाली आणली. अफगाणिस्तानने 8 धावांनी (DRS) हा सामना जिंकला. बांगलादेश संघ 105 धावांवर सर्वबाद झाला.
त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत 27 जूनला पहिल्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. जर अफगाणिस्तान संघ जिंकला तर 2024 च्या T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्यांचा सामना भारत किंवा इंग्लंड यांच्यापैकी एका संघाशी होईल.