MS Dhoni Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी चाहत्यांचं त्याच्यावरील प्रेम मात्र किंचित कमी झालेलं नाही. आयपीएलमुळे (IPL) धोनीचा चाहतावर्ग प्रत्येक हंगामानंतर वाढतच आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अनेक मोठे रेकॉर्ड केले आहेत. 2007 टी-20 वर्ल्डकप, 2011 एकदिवसीय वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकत धोनीने भारतीय संघाला अनेक मोठे विजय मिळवून दिले होते. यामुळे त्याला आतापर्यंतच्या यशस्वी कर्णधारात गणलं जातं. फक्त प्रेमच नाही तर चाहत्यांकडून त्याला तितकाच आदरही दिला जातो. याचा प्रत्यय अनेकदा येत असतो. नुकताच असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी भारतीय संघात नसला तरी आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाचं नेतृत्व करताना दिसतो. पण यामुळे वर्षातून फक्त एकदाच क्रिकेट चाहत्यांना त्याला खेळताना पाहण्याची संधी मिळत आहे. पण सोशल मीडियामुळे चाहत्यांची निराशा होत नाही. या ठिकाणी धोनीचे अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून चाहत्यांचं त्याच्यावर असणारं प्रेम दिसतं. 


धोनीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत धोनी विमानातून प्रवास करताना दिसत आहे. दरम्यान रांचीमध्ये बजेट एअरलाइन कनेक्टिव्हिटी असल्याने इकॉनॉमितून प्रवास करत होता. त्यातही तो तिसऱ्या रांगेत बसला होता. 


धोनी आपल्या विमानातून प्रवास करत असल्याने यावेळी एअर होस्टेसचाही आनंद मावेनासा झाला होता. दरम्यान, यावेळी तिने धोनीला चॉकलेट ऑफर केले. यावेळी धोनीनेही त्यातील फक्त एकच चॉकलेट उचललं आणि तिचे आभार मानले. 



या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. "सगळेच चाहते त्याच्यासमोर किती गोड होतात", असं एका चाहत्याने लिहिलं आहे. तर "एकाने चॉकलेट खाण्याची इच्छा झाली", असं म्हटलं आहे.


दरम्यान चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी नुकतंच धोनीच्या गुडघ्याला जखम झालेली असतानाही त्याने कधीच तक्रार केली नाही असा खुलासा केला होता. 


धोनीने आयपीएल 2023 मधील एकही सामना चुकवला नाही. त्याने संघाचं फक्त नेतृत्वच केलं नाही तर पाचव्यांदा जेतेपद जिंकून दिलं. आयपीएलनंतर धोनीच्या गुडघ्यावर सर्जरी करण्यात आली. त्यानंतर धोनी आता पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. 


सीएसकेचे सीईओ विश्वनाथन म्हणाले की, "संपूर्ण आयपीएलदरम्यान त्यांनी कधीही धोनीला इच्छा नसेल तर खेळू नकोस असं सांगितलं नाही. अनफिट असता तर त्याने आधीच स्पष्ट केलं असतं हे मला माहिती होतं".