मुंबई: भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गांगुलीची एक नवी अदा पहायला मिळते आहे. ज्यात गांगूली क्रिकेट विश्वापासून बराच दूर जात एक वेगळी लाईफस्टाईल अनुभवताना दिसतोय. खरेतर हा व्हिडिओ पाहून अनेकांना काहीसा धक्काही बसेल. कारण, आजवर क्रिकेटच्या मैदानावर किंवा कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून क्रिकेट सामन्यांची धावती वर्णनं ऐकवताना सौरवला अनेकांनी पाहिले आहे. पण, नाईट क्लबमध्ये जाऊन डान्स करताना सौरवला तुम्ही पाहिले आहे का? नाही ना. नेमके या व्हिडिओत सौवर अशाच काहीशा अंजादात दिसतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमीच गंभीर भासणारा सौरव या व्हिडिओत एखाद्या अल्लड मुलासारखा भासतो. ऑरेंज रंगाचा शर्ट परिधान करून सौरव अनोख्या अंदाजात नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ कोलकातातील नाईट क्लबमधील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओत सौरवसोबत इतरही काही लोक नाचताना दिसत आहेत. 


सौरभ गांगुलीचा अनोखा अंदाज, पाहा एक दुर्मिळ व्हिडिओ