Yashasvi Jaiswal Viral Video With Fan Girl: भारतीय संघाचा नवा स्टार यशस्वी जैस्वाल सध्या चांगलाच चर्चेत आहे. सध्या यशस्वीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये पहिल्या 3 सामन्यांमध्ये यशस्वीने 2 द्विशतकं झळकावली आहेत. या मालिकेमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. 22 वर्षीय यशस्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तो एका चाहतीबरोबर बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमधून कर्णधार रोहित शर्माचा संघात किती दरारा आहे हे दिसून येत आहे. 


काय आहे व्हिडीओमध्ये?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हायरल व्हिडीओमध्ये यशस्वी भारतीय संघाच्या नेट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या भगव्या जर्सीमध्ये दिसत आहे. यशस्वी एका बाल्कनीमध्ये उभा असून खालच्या बाजूला असलेल्या प्रेक्षकांच्या बसण्याच्या जागेवरुन एका महिला चाहतीने हा व्हिडीओ शेअर केल्याचं दिसत आहे. ही चाहती यशस्वीकडे तुझ्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीला खाली बघायला सांग ना, असा आग्रह करते. अनेकदा ही तरुणी यशस्वीला शेजारच्या व्यक्तीला एकदा खाली बघायला सांग अशी विनंती करत असते. मात्र यशस्वी तिला थेट शब्दांमध्ये नकार देतो. चेहऱ्यावर स्मितहास्यासहीत यशस्वी, 'मुझे डर लगता है इनसे' असं म्हणतो. यावर ही महिला चाहती तुलाही त्याची भिती वाटते का? असा प्रश्न विचारताना दिसते.


हा व्हिडीओ शेअर करताना चाहतीबरोबर बोलताना यशस्वी जैस्वाल म्हणतोय की, 'मुझे भी डर लगता है उनसे (रोहित शर्मा से)' अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडीओला 1 लाख 10 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.



दमदार कामगिरी


हा व्हिडीओ नेमका कधीची आहे हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र सध्या आपल्या तुफान कामगिरीमुळे यशस्वी चर्चेत असल्याने हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सलग 2 द्विशतकं झळकावल्याने 'आयसीसी'च्या कसोटी रँकिंगमध्ये जैस्वालने 14 स्थानांनी झेप घेतली आहे. तो फलंदाजाच्या यादीमध्ये आता 29 वरुन थेट 15 व्या स्थानावर पोहोचला आहे. जैस्वालने विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावामध्ये 209 धावा केल्या होत्या. तर राजकोटच्या दुसऱ्या डावामध्ये नाबाद 214 धावांची खेळी केलेली. भारतीय संघाने सध्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये 2-1 ची आघाडी घेतली आहे. सध्या मालिकेतील चौथी कसोटी रांचीमध्ये सुरु आहे.