आयसीसीच्या वनडे आणि टेस्ट टीम ऑफ द ईयरचा विराट ठरला कर्णधार
विराट कोहलीचा कर्णधार होण्याचा बहुमान
दुबई : इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC)ने २०१८ मधील सर्वश्रेष्ठ कामगिरीवर विविध अवॉर्डची घोषणा केली आहे. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा आयसीसीच्या वनडे टीमचा कर्णधार ठरला आहे. आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर आणि आयसीसी टेस्ट टीम ऑफ द ईयरची घोषणा केली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने टेस्ट आणि वनडे दोन्ही टीमचा कर्णधार असण्याचा मान पटकावला आहे. महत्त्वाचं म्हणजे वनडे टीममध्ये ४ भारतीय खेळाडूंना स्थान मिळालं आहे. तर टेस्ट टीममध्ये ३ भारतीय खेळाडूंना स्थान मिळालं आहे.
विराट फलंदाजांमध्ये ही अव्वल
ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सिरीजमध्ये पहिल्या विजयानंतर भारतीय टीम आणि कर्णधार विराट कोहलीने सोमवारी जाहीर झालेल्या आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. भारत 116 अंकासह नंबर 1 टेस्ट टीम बनली आहे. कर्णधार विराट कोहली देखील 922 अंकांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या नंतर न्यूझीलंडच्या कर्णधार केन विलियमसन आहे. विलियमसनचे 897 गुण आहे. तो विराटपासून 25 गुण मागे आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जबरदस्त कामगिरी करणारा चेतेश्वर पुजारा तिसऱ्या स्थानावर आहे. तर युवा क्रिकेटर ऋषभ पंतने 17 वं स्थान मिळवलं आहे.