कोलकाता : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५० रन्सनं विजय झाला आहे. भारताच्या २५३ रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया २०२ रन्सवर ऑल आऊट झाली. कुलदीप यादवची हॅट्रिक, भुवनेश्वरच्या तीन विकेट तसंच हार्दिक पांड्या आणि युझुवेंद्र चहालला प्रत्येकी दोन विकेटमुळे भारताचा विजय सोपा झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याआधी विराट कोहलीच्या ९२ रन्स आणि अजिंक्य रहाणेच्या ५५ रन्समुळे भारतानं २५२ रन्सपर्यंत मजल मारली. विराट कोहलीचं शतक केवळ ८ रन्समुळे हुकल्यानं रिकी पॉटिंगचं रेकॉर्ड तोडण्याची संधीही गमावली.


विराट कोहली आणि रिकी पॉटिंगची वनडेमध्ये ३० शतकं आहेत. वनडेमध्ये सर्वाधिक शतकं मारण्याऱ्यांमध्ये विराट आणि पॉटिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरनं वनडेमध्ये सर्वाधिक ४९ शतकं केली आहेत. विराटनं १९६ मॅचमध्ये ५५ च्या सरासरीनं ८,६७९ रन्स बनवले आहेत.


नर्व्हस नाईंनटीजमध्ये कोहली पाचव्यांदा आऊट


विराट कोहली आत्तापर्यंत ५ वेळा ९० रन्सच्या टप्प्यात आऊट झाला आहे. तर एकदा ९६ रन्सच्या स्कोअरवर नॉट आऊट राहिला आहे. नर्व्हस नाईंनटीजमध्ये सर्वात जास्त वेळा आऊट झालेला भारतीय सचिन तेंडुलकर आहे. सचिन १७ वेळा नर्व्हस नाईंनटीजमध्ये आऊट झाला. यानंतर गांगुली ६ वेळा तर सेहवाग ५ आणि कोहली ५ वेळा नर्व्हस नाईंनटीजमध्ये आऊट झाला.