Virat Kohli : टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या त्याच्या खराब फॉर्ममुळे टीकेचा धनी ठरला आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे त्याच्यावर वारंवार टीका करण्यात येत आहे. भारतीय संघातील माजी खेळांडूंनी ही विराटच्या फॉर्मबाबत (Virat Kohli) शंका उपस्थित केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर आता इतरही लोक त्याला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विराटने आंतरराष्ट्रीय शतक झळकावून 1000 दिवस झाले आहेत आणि बार्मी आर्मीने (Barmy Army) याबद्दल ट्विट करून विराटला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.


परंतु भारतीय क्रिकेट चाहत्यांनीही विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.विराट कोहलीने एकूण 70 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत विराटच्या पुढे फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसरा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच हे दोनच फलंदाज आहेत.


सचिन तेंडुलकरने 100 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. तर पाँटिंगच्या खात्यात 71 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. बार्मी-आर्मीने ट्विटर करत '1000 दिवस' असे म्हटलं आहे.



हे ट्विट विराटला ट्रोल करण्यासाठी करण्यात आल्याचे भारतीय चाहत्यांना कळून चुकले. यानंतर भारतीय चाहत्यांनीही बार्मी आर्मीला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.


Mufaddal Vohra या ट्विटर युजरने त्या ट्विटला उत्तर दिलं आहे."3532 दिवस झाले, इंग्लंडने भारताविरुद्ध भारतामध्ये कोणत्याही फॉरमॅटमध्ये मालिका जिंकलेली नाही," असे Mufaddal Vohra यांनी म्हटले आहे. 



तर आणखी एका युजरने ब्रिटनच्या राणीने एकही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली नाही, असे म्हटले आहे.