विराट कोहलीने तरुणांना दिला खास सल्ला
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने तरुणांना एक खास सल्ला दिला आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने तरुणांना एक खास सल्ला दिला आहे.
आपल्या आक्रमक आणि वेगवान खेळासाठी ओळखला जाणाऱ्या क्रिकेटर विराट कोहलीचे जगभरात असंख्य चाहते आहेत. सर्वचजण विराटचा खेळ आणि त्याच्या फिटनेसची स्तुती करत असतं.
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने आपल्या चाहत्यांना आणि देशातील तरुणांना एक खास सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर वेळ वाया न घालवता आऊटडोर स्पोर्ट्सकडे अधिक लक्ष द्या असा सल्ला विराटने तरुणांना दिला आहे.
लाइफस्टाइल ब्रँड वन८ च्या लॉन्चिंग दरम्यान आयोजित कार्यक्रमात विराटने म्हटलं की, सध्याच्या काळात लहान मुलं बाहेर खेळण्याऐवजी व्हिडिओ गेम खेळण्यात मग्न असतात. शारीरिक हालचाल होणं फार महत्वपूर्ण आहे. माझा संदेश हा केवळ तरुणांसाठी नाही तर देशातील प्रत्येक नागरिकासाठी आहे."
कोहलीने युवकांना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला देत म्हटलं की, "सोशल मीडियावर एक ठराविक काळाच खर्च करावा. मी सुद्धा सोशल मीडियावर खूप वेळ खर्च करत होतो मात्र, नंतर मला कळलं की हा वेळ आपण वाया घालवत आहोत".
विराट कोहलीने ब्रँड लॉन्चिंगनंतर तेथे उपस्थित असलेल्या तरुण-तरुणींसोबत बास्केटबॉल आणि फुटबॉल खेळला.
विराटने सांगितलं की, "लहान मुलांनी घरातून बाहेर पडावं आणि त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. ज्यावेळी आपण शरीराची, फिटनेसची काळजी घेण्यास सुरुवात करतो त्यावेळी आरोग्यासंबंधी सर्व समस्या दूर होतात. यावेळी विराटने तरुणांना मोबाईलपासूनही दूर राहण्याचा सल्ला दिला.