मुंबई : सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिचा पती विराट कोहली त्यांच्या गोंडस मुलीसोबत वामिका शर्मा कोहलीसोबत सुट्ट्या एन्जॉय करतेय. विराट अनुष्का वामिकाला मीडिया आणि पापाराझीपासून दूर ठेवणंच पसंत करतात. दरम्यान नुकतंच विराट अनुष्काच्या व्हेकेशनचा एक मस्त फोटो सोशल मीडियावर समोर आला होता ज्यावर लाईक्सचा पाऊस पडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान अनुष्का शर्माने 'या' व्हेकेशनचा आणखी एक छान फोटो शेअर केला आहे. अनुष्काने तिला फिरण्यासाठी सायकल भाड्याने घेतली असल्याचं या फोटोमध्ये दिसतंय. रेंटवर घेतलेल्या सायकलमध्ये वामिकाचा चेहरा लपवत हा फोटो शेअर करण्यात आला आहे. अनुष्काने ही सायकल भाड्याने घेतली असली तरी त्यावर तिच्या मुलीचे नाव वामिका लिहिलंय.



हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे चित्रपट आणि क्रिकेट जगतातील पॉवर कपल मानले जातात. दोघंही सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह दिसतात. मात्र दोघांपैकी एकानेही अजून वामिकाचा फोटो शेअर केला नाही.


अनुष्काने शेअर केलेल्या अजून एका फोटोमध्ये तिने काळ्या-पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचा स्ट्रॅपी ड्रेस घातलाय. त्याचबरोबर विराटने स्लीव्हलेस ब्लॅक टी-शर्ट घातलाय. त्याच्या गळ्यात एक लांब नेकपीसही दिसतो. फोटोमध्ये दोघंही खूप आनंदी आणि सुंदर दिसतायत.