मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन-डेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. त्यानं आपल्या वन-डे करिअरमधील 31 वी सेंच्युरी झळकावली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सेंच्युरीसह विराटनं ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगचा 30 सेंच्युरीजचा रेकॉर्ड मोडित काढला. त्याचप्रमाणे वन-डेत सर्वाधिक सेंच्युरीज कऱणा-या बॅट्समनमध्ये सचिन तेंडुलकरनंतर आता कोहली दुस-या क्रमांकावर आहे. 


सचिनच्या नावावर 49 वन-डे सेंच्युरीज आहेत. दरम्यान, आपल्या 200 व्या वन-डेत सेंच्युरी ठोकण्याचा कारनामा विराट कोहलीनं केला. संकटात सापडलेल्या टीमला बाहेर काढत त्यानं 121 रन्सची झुंजार इनिंग खेळली. 


दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारतावर ६ विकेट्सनी मात केली आहे. भारताने प्रथम बॅटिंग करत न्यूझीलंडसमोर २८१ धावांचे आव्हान समोर ठेवले होते. ते आव्हान न्यूझीलंडने  विकेट राखत पूर्ण केले.