Virat Kohli Rohit Sharma: विराट की रोहित? इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलं जाणारं नाव कोणाचं?
Virat Kohli Rohit Sharma: नुकतंच क्रिकेटसंदर्भात एक लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सप्टेंबर महिन्यात सर्वात जास्त चर्चेत असलेले भारतीय अकाऊंटची माहिती देण्यात आलीये.
Virat Kohli Rohit Sharma: सध्या टीम इंडियातील 2 प्रमुख खेळाडू म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली. या दोघांचेही चाहते केवळ देशात नाही तर संपूर्ण जगात आहे. दोघांचीही फॅन फोलोविंग तगडी आहे. नुकतंच क्रिकेटसंदर्भात एक लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सप्टेंबर महिन्यात सर्वात जास्त चर्चेत असलेले भारतीय अकाऊंटची माहिती देण्यात आलीये. यामध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा नवव्या क्रमांकावर आहे.
पहिल्या क्रमांकावर कोण?
भारतीय क्रिकेटमधील दोन महान खेळाडूंची ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. या यादीत पहिले नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे. यानंतर दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीचा दुसरा क्रमांक लागतो. तर बॉलिवूडचा किंग शाहरूख खान तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर विजय सेतुपती आणि यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या नावाची चर्चा होताना दिसतेय.
या लिस्टमध्ये सहाव्या क्रमांकावर पवन कल्याण यांचं नाव येतं. तर सातव्या क्रमांकावर सर्वांचा लाडका अभिनेता भाईजान म्हणजेच सलमान खानचं नाव आहे. त्यानंतर आठव्या क्रमांकावर राहुल गांधी आणि नवव्या क्रमांकावर रोहित शर्माचा नंबर येतो. यानंतर अभिनेता अक्षय कुमार दहाव्या क्रमांकावर असल्याचं दिसून येतंय.
रोहित शर्मा कोणत्या क्रमांकावर आहे?
अशा परिस्थितीत टॉप 10 च्या यादीत पीएम मोदींनंतर रोहित शर्माचे नाव दुसऱ्या क्रमांकावर, विराट कोहली आणि अक्षय कुमारच्या आधी आणि नवव्या स्थानावर आहे. वर्ल्डकपबद्दल बोलायचे झालं तर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गज क्रिकेटपटूंवर बरंच काही अवलंबून आहे. टॉप 10 च्या यादीत आल्यानंतर हे दोन्ही क्रिकेटपटू चर्चेत आहेत. वर्ल्डकपपूर्वी दोन्ही फलंदाज जबरदस्त कामगिरी करताना दिसतायत.
वर्ल्डकपसाठी कशी आहे टीम इंडिया?
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.