IPL 2022: क्लीन बोल्ड झाल्यावर संतापला Virat Kohli, रागाच्या भरात....
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीयो व्हायरल होताना दिसतोय.
मुंबई : सध्याचा सर्वात फीट खेळाडू म्हणजे विराट कोहली मानला जातो. फिटनेस किंवा नेट प्रॅक्टिसमध्ये कधीही विराट तडजोड करत नाही. याशिवाय त्याचा आक्रामकपणा त्याची ओळख आहे. नुकतंच मैदानावर विराटचा हा अक्रामकपणा पुन्हा पहायला मिळाला.
c या व्हिडीयोमध्ये विराट कोहली नेट्समध्ये प्रॅक्टिस करतोय. सरावादरम्यान लेग स्पिनरद्वारे फेकल्या गेलेल्या बॉलवर विराट बोल्ड झाला. मुळात बॉलला कट मारायला जाताना आऊट झाला. यानंतर विराट कोहली संतापला.
प्रॅक्सिसमध्येही खराब शॉट खेळल्यानंतर विराट कोहली स्वतःवर रागात दिसून आला. यावेळी राग आल्यानंतर त्याने स्वतःच्या बॅटने स्टंपला मारण्याचा प्रयत्न केला.
आयपीलएलमध्ये विराट कोहली आतापर्यंत तितका चांगला खेळ दिसला नाही. या स्टार फलंदाजाने आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूसाठी तीन सामन्यांत केवळ 58 रन्स केले आहेत. पंजाब किंग्जविरुद्ध आरसीबीच्या पहिल्या सामन्यात कोहलीने 29 चेंडूत 41 रन्स केले त्यानंतर त्याने KKR विरुद्ध 12 आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध अवघे 5 रन्स केले.
आयपीएलमध्ये विराट सर्वात यशस्वी फलंदाज
विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी कोहलीने 210 सामन्यांमध्ये 37.30 च्या सरासरीने 6341 रन्स केले होते. यादरम्यान त्याने 42 अर्धशतकं आणि 5 शतके झळकावली आहेत. कोहलीने 140 आयपीएल सामन्यांमध्ये आरसीबीच्या कर्णधारपदाची धुराही सांभाळली आहे.