WPL 2023 Smriti Mandhana Captain RCB : भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना (Smriti Mandhana) नेहमी चर्चेचा विषय असते. नुकत्याच झालेल्या ऑक्शनमध्ये (WPL 2023 Auction) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच RCB ने 3 कोटी 40 लाख रुपयाची बोली लागली. सर्वाधिक रकमेवर आरसीबीने स्मृतीला संघात सामील करून घेतलंय. अशातच आता विराट कोहलीने (Virat Kohli) आयसीबीच्यावतीने मोठी घोषणा केली आहे. (virat kohli announce smriti mandhana as captain rcb womens team for wpl 2023)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला आयपीएलच्या (WPL 2023) पहिल्या हंगामाला चार मार्चपासून सुरुवात होणार आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानावर मुंबई आणि गुजरातमध्ये पहिला सामना रंगणार आहे. त्यामुळे आता संघाचं नेतृत्व कोण करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता आयसीबीने कॅप्टनची घोषणा (RCB Announce captain) केली आहे. सर्वांना अपेक्षित होतं तेच नाव समोर आलंय...'स्मृती मानधना'


आणखी वाचा - TATA IPL Schedule 2023: आलं रे...आयपीएलचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या Mumbai Indians चं पूर्ण शेड्यूल!


स्मृती मानधना आता आरसीबीची धुरा सांभाळणार आहे. आरसीबी फ्रँचायझीने एक व्हिडिओ पोस्ट करून याबद्दलची माहिती दिली. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) डब्ल्यूपीएलसाठी स्मृती मानधनाचं (Smriti Mandhana Captain Of RCB) नाव जाहीर करून आरसीबीच्या कर्णधारपदाची घोषणा केली.


पाहा Video -  



दरम्यान, आम्ही स्मृतीकडे नेतृत्वाची भूमिका सोपवली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की स्मृती आरसीबीला आणखी उंचीवर नेईल, असं आरसीबीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा यांनी म्हटलं आहे. विराट कोहलीने आपल्या खास अंदाजात स्मृतीला शुभेच्छा दिल्या आहेत. विराटनंतर आता पुन्हा 18 नंबरची जर्सी (Number 18 jersey) कॅप्टनसी सांभाळणार आहे.