विराट-अनुष्कामुळे इंग्लंडमध्ये अजिंक्य रहाणेचा अपमान?
भारत आणि इंग्लंडमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला ९ तारखेपासून लॉर्ड्सवर सुरुवात होणार आहे.
लंडन : भारत आणि इंग्लंडमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला ९ तारखेपासून लॉर्ड्सवर सुरुवात होणार आहे. पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर या टेस्ट मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल. त्याआधी भारतीय टीमसाठी लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयात भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर बीसीसीआयनं या कार्यक्रमाचा एक फोटो शेअर केला. या फोटोवरून आता बीसीसीआयवर टीकेची झोड उठली आहे.
या फोटोमध्ये भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा पुढच्या रांगेमध्ये उभी आहे. तर भारतीय टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे शेवटच्या रांगेत उभा आहे. यामुळे सोशल नेटवर्किंगवरून बीसीसीआयवर टीका होत आहे.
अनुष्का शर्मा भारतीय टीमची सदस्य आहे का? हा फॅमीली फोटो नाही, टीम इंडियाचा फोटो आहे. दुसऱ्या क्रिकेटपटूच्या पत्नी या अधिकृत दौऱ्यावर नाहीत. भारताचा उपकर्णधार शेवटच्या रांगेमध्ये आणि भारतीय क्रिकेट टीमची पहिली महिला पहिल्या रांगेमध्ये... काही दिवसांपूर्वी हीच लोकं ऑनलाईन लेक्चर देत होती... अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ट्विटरवर येत आहेत.