लंडन : टीम इंडिया वर्ल्डकपसाठी सध्या इंग्लंडमध्ये आहे. टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्डकपमधील खेळलेल्या सर्व मॅच जिंकल्या आहेत. अशातच आता टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा या दोघांचे इंग्लंडमधील फिरतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुष्का शर्मा काही दिवसांपूर्वीच टीम इंडिया आणि विराट कोहलीला सपोर्ट करण्यासाठी पोहचली आहे. विरुष्काचे इंग्लंडमध्ये एकत्र फिरतानाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


विराट-अनुष्का या दोघांचा फोटो एका चाहत्याने इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. हा फोटो फॅनपेजवरुन शेअर करण्यात आला आहे. 'लंडनच्या ओल्ड बॉन्ड स्ट्रीट येथे आज एकत्र विराट-अनुष्का' अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे.


 



टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतरचा हा फोटो असल्याचं कळतं आहे. पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाला 2 दिवसांची विश्रांती देण्यात आली.


विरुष्का सोबतच आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये विरानुष्का सोबत शिखर धवन देखील आहे. धवन सोबत त्याची बायको आणि त्याचा मुलगा देखील आहे. त्यासोबत टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा त्याच्या कुटुंबसोबत दिसत आहे. शिखर धवनने हा फोटो शेअर केला आहे.  


 



पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाच्या प्रशासनाने 2 दिवस टीम इंडियाला विश्रांती देणार असल्याची माहिती दिली.  


टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत 4 सामने खेळले आहेत. यातील न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही टीमला प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात आला. तर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या टीमचा पराभव केला आहे. टीम इंडिया 7 पॉइंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाची पुढील मॅच 22 जूनला अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे.