मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाह बंधनात अडकले. इटलीच्या बोर्गो फिनोचीतो रिसॉर्टमध्ये लग्न झालं. इटलीतलं हे रिसॉर्ट जगातल्या सगळ्यात महाग रिसॉर्टपैकी एक आहे. एवढ्या महागड्या रिसॉर्टमध्ये लग्न केल्यानंतर या दोघांच्या संपत्तीबाबतही चर्चा सुरु झाली. सध्या विराट आणि अनुष्का शर्माची एकूण संपत्ती जवळपास ६०० कोटी रुपये एवढी आहे.


विराट-अनुष्काची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न झाल्यामुळे आता या दोघांची ब्रॅण्ड व्हॅल्यू आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जातोय. ब्रॅण्ड अॅनालिस्ट आणि परसेप्ट प्रोफाईल लिमिटेडचे संचालक शैलेंद्र सिंग यांनी या दोघांच्या ब्रॅण्डबाबत प्रतिक्रिया दिली आहे. येत्या दोन वर्षांमध्ये विराट आणि अनुष्काची संपत्ती एक हजार कोटी रुपये होईल, असं वक्तव्य शैलेंद्र सिंग यांनी केलं आहे.


या जाहिरातींमध्ये दिसणार विरुष्का?


विराट अनुष्कानं लग्न केल्यामुळे कौटुंबिक, स्थिरता, इमानदारी आणि भरवसा दाखवणाऱ्या जाहिरातींमध्ये विराट-अनुष्का दिसतील. गृहकर्ज, कार आणि इन्श्यूरन्स पॉलिसीसारख्या जाहिराती लवकरच या दोघांना मिळतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.


विराट-अनुष्काची कमाई किती?


फिनेप्प रिपोर्टनुसार विराटची एकूण संपत्ती ३८२ कोटी रुपये आणि अनुष्काची संपत्ती २२० कोटी रुपये आहे. विराटच्या संपत्तीमध्ये मॅच फी, आयपीएलमध्ये मिळणारे पैसे, जाहिरातींचा समावेस आहे. तर अनुष्काच्या कमाईमध्ये चित्रपट आणि जाहिरातींचा समावेश आहे.


अनुष्काच्या संपत्तीमध्ये मागच्या तीन वर्षांमध्ये ८९ टक्के वाढ झाली आहे. आगामी तीन वर्षांमध्ये तिची संपत्ती ३० टक्के वाढेल तर वार्षिक कमाई १८ टक्के वाढेल, असा अंदाज फिनेप्पनं वर्तवला आहे.


अनुष्का शर्मा एका चित्रपटासाठी १० कोटी रुपये घेते तर जाहिरातींमधून तिला ४ कोटी रुपये मिळतात, अशी माहिती आहे. रियल इस्टेटमध्ये अनुष्कानं ४० कोटी रुपये गुंतवले आहेत. अनुष्काकडे कमीतकमी चार गाड्या आहेत. यामध्ये बीएमडब्ल्यू, रेंज रोवर आणि मर्सिडिजसारख्या गाड्यांचा समावेश आहे. यांची किंमत ५ कोटी रुपये आहे.


विराटची कमाई किती?


विराट कोहली वर्षाला १२० कोटी रुपये कमावतो. विराट कोहलीकडे सध्या सहा गाड्या आहेत. याची किंमत ९ कोटी रुपये आहे. विराटकडे मर्सिडिज, बीएमडब्ल्यू, वोक्सवॅगन आणि ऑडीचा समावेश आहे.


विराट-अनुष्का २८ ब्रॅण्ड्सचे अॅम्बेसेडर


विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या २८ ब्रॅण्ड्सच्या एकत्र जाहिराती करतात. यामध्ये हेड अॅण्ड शोल्डर, मान्यवर, पेप्सी, सेलकोन, बूस्ट, ऑडी, फास्ट ट्रॅक, जिओनी, रोगन आणि पोलेरायड हे प्रमुख ब्रॅण्ड आहेत.


दोघांचे वेगवेगळे व्यवसाय


याचबरोबर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे वेगवेगळे व्यवसायही आहेत. विराट कोहली चिसल नावाची जिम चेन चालवतो. तसंच दुबईच्या एका टेनिस टीममध्ये विराटची पार्टनरशिप आहे. तर अनुष्का शर्माचं क्लीन स्लेट नावाचं प्रॉडक्शन हाऊस आहे. नुश नावाचा कपड्यांचा ब्रॅण्डही अनुष्का शर्माचाच आहे.