मुंबई : काळ्यापिवळ्या टॅक्सीवाल्यांसोबत भांडण नको म्हणून एका क्लिकवर दारात एसी गाडी मिळवण्याचे आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अशापैकी एक म्हणजे उबर  
 
 उबर टॅक्सीमुळे देशभरात अनेक ठिकाणी एका क्लिकवर सुरक्षित फिरणं शक्य झाले आहे. आता ही टॅक्सी सेवा देशात लोकप्रिय करण्यासाठी पहिल्यांदा उबर इंडियाने ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसिडरची निवड केली आहे.   


ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसिडर विराट कोहली  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट मैदानावरील तुफान खेळी असो किंवा अगदी त्याची फॅशन स्टेटमेन्ट असो या सार्‍यामुळे विराट तरूणांच्या गळ्यातला ताईत आहे. विराटच्या या लोकप्रियतेची भूरळ 'उबर इंडिया'ला पडली आहे. 


उबर इंडियानं विराट कोहलीची निवड ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून केली आहे.  


खास व्हिडिओ 


 



आज विराट कोहलीने ट्विटरवर उबर इंडियाच्या सेवेबद्दलचा पहिला व्हिडिओ शेअर केला आहे. 
उबरमुळे प्रवास सुकर होईल सोबतच समाजात अनेकांना आर्थिक संधी मिळणार आहे. त्यामुळे उबरने प्रवास करायला सज्ज व्हा. मी या प्रोजेक्टला घेऊन खूपच उत्साहीत आहे अशा आशयाचा खास मेसेज त्याने चाहत्यांसोबर शेअर केला आहे.