Virat Kohli On Secret Place : गेल्या दोन महिन्यांपासून सुट्टीवर असणाऱ्या विराट कोहलीने (Virat Kohli ) आयपीएलमध्ये धावांची तडाखा लगावण्यास सुरूवात केली आहे. पंजाब किंग्जविरुद्धटच्या सामन्यात विराट कोहलीने 77 धावांची खेळी करून विरोधकांची तोंड गप केली आहेत. विराट कोहलीने आयसीबीच्या (RCB) विजयाचा नारळ फोडून टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आपण तयार असल्याचं देखील सांगितलं आहे. विराटच्या कमबॅकने चाहते देखील खूश आहेत. मात्र, विराट गेली दोन महिने कुठं होता? याचा पत्ता काही चाहत्यांना लागला नाही. त्यावर आता खुद्द विराट कोहलीने बोलताना खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला विराट कोहली?


होय, आम्ही भारतात नव्हतो. आम्ही अशा ठिकाणी होतो जिथं लोक आम्हाला ओळखतही नव्हते. मला फक्त माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा होता आणि दोन महिने सामान्य जीवन जगायचं होतं. फक्त आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी... माझ्यासाठी तो एक अद्भुत अनुभव होता. साहजिकच दोन मुलांनंतर गोष्टी पूर्णपणे वेगळ्या होतात. माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याच्या संधीबद्दल मी देवाचे आभार मानतो. रस्त्याने चालत असताना समोरून येणारी व्यक्ती तुम्हाला ओळखत नाही हा वेगळाच अनुभव असतो, असं विराट कोहलीने म्हटलं आहे.


किंग कोहलीने फुंकलं रणशिंग


बीसीसीआयची निवड समिती आणि संघ व्यवस्थापन विराट कोहलीला जूनमध्ये होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) स्पर्धेत संघात घेण्यात इच्छुक नाहीत, अशी माहिती समोर आली होती. यावर विराटने पहिल्यांदाच भूमिका घेतली.  जेव्हा टी-20 क्रिकेटचा विचार केला जातो तेव्हा माझं नाव आता जगाच्या विविध भागांमध्ये खेळाचा प्रचार करण्यासाठी वापरलं जातंय. पण, मला असं वाटतंय की माझ्यामध्ये अजूनही टी-ट्वेंटी क्रिकेट शिल्लक आहे, असं विराट कोहली म्हणाला. त्यामुळे आता विराट आगामी ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी इच्छुक आहे, असं स्पष्ट होतंय.


आरसीबीचा संघ (Royal Challengers Bengaluru Squad)


फाफ डू प्लेसिस (C), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (WK), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल, सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, विजय विशक, स्वप्नील सिंग, आकाश दीप, लॉकी फर्ग्युसन, विल जॅक्स, मनोज भंडागे, सौरव चौहान, राजन कुमार, हिमांशू शर्मा, टॉम करन, रीस टोपले.