सेंचुरियन : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नुकतेच मीडियाला आपल्या निशाण्यावर घेतलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर कोहली भडकला. कोहलीला या गोष्टीचा राग आहे की जेव्हा टीम टेस्ट सीरिजमध्ये चांगल प्रदर्शन करत नव्हती तेव्हा मीडियाने त्याला वेगळाच रंग दिला. आणि कोहली अशा पद्धतीने मीडियावर भडकला ही काही पहिली वेळ नाही 


मला कुणाकडून कौतुक नकोय, असं का म्हणाला कोहली?  



जेव्हा कोहलीला विचारण्यात आलं की, विश्व क्रिकेटमध्ये जेव्हा तुला आता सर्वश्रेष्ठ फलंदाज बोललं जातं तेव्हा तुला कसं वाटतं. तेव्हा कोहली म्हणाला की, मी जसं सांगितलं मला कुणाकडून कोणतंही कौतुक नकोय. मला चर्चेत राहायचं नाही. मी फक्त माझं काम करत आहे. लोकांवर असतं की त्यांनी काय लिहायचं काय बोलायचं. हे माझं काम आहे. त्यामुळे मी जे करतोय ते मला करायलाच हवं. कुणाकडून कौतुक व्हावं यासाठी मी हे करत नाही. भरपूर मेहनत करून मला संघासाठी सर्वश्रेष्ठ कामगिरी करायची आहे. 


ड्रेसिंग रूममधील सन्मान का महत्वाचा 


तसेच कोहली म्हणतो की, मला माहित आहे मी आणि माझी टीम काय करत आहे. त्यामुळे मला कुणाकडूनच काही उत्तराची अपेक्षा नाही. जेव्हा आम्ही 0 - 2 ने मागे होतो तेव्हा देखील मी हा विचार केला नाही. आणि जेव्हा आता 5 - 1 ने पुढे आहोत तेव्हाही या सगळ्याचा विचार करत नाही. माझ्यासाठी ड्रेसिंग रूमवरील सन्मान अधिक महत्वाचा आहे.