जमैका : जमैकाच्या सबीना पार्क स्टेडियममध्ये भारताने पाचवी वनडे जिंकत वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका ३-१ने जिंकली. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा आणखी एक रेकॉर्ड मो़डला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात विराटने नाबाद १११ धावांची खेळी केली. कोहलीने ११५ चेंडूत १२ चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने नाबाद १११ धावा तडकावल्या. तब्बल ६ महिने आणि ११ डावानंतर कोहलीने हे शतक बनवले. त्याचे हे कारकिर्दीतील २८वे शतक आहे. १८१ डावांत कोहलीने २८वे शतक बनवलेय. जयसूर्याला इतकीच शतके बनवण्यासाठी ४३३ डावात खेळावे लागले. 


या शतकासोबतच कोहलीने सचिनचा आणखी एक रेकॉर्ड बनवलाय. कोहलीने धावांचा पाठलाग करताना आपले १८वे शतक पूर्ण केले. धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतके बनवण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने धावांचा पाठलाग करताना १७ शतके ठोकली होती. सचिनचा हा रेकॉर्ड कोहलीने मोडीत काढला.