विशाखापट्टणम : विराट कोहलीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. वनडे क्रिकेटमध्ये विराटनं १० हजार रन पूर्ण केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये एवढ्या जलद १० हजार रन पूर्ण करणारा विराट पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विराटनं २०५व्या इनिंगमध्ये हा टप्पा ओलांडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटला हा टप्पा ओलांडायला ८१ रनची गरज होती. सचिन तेंडुलकरनं हे रेकॉर्ड २५९ इनिंगमध्ये केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीनं वनडेमध्ये आत्तापर्यंत ३६ शतकं केली आहेत. वनडेत सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकर याच्या नावावर वनडेमध्ये सर्वाधिक ४९ शतकांची नोंद आहे. वनडे क्रिकेटमध्ये १० हजार रन पूर्ण करणारा विराट १३वा खेळाडू बनला आहे.


याआधी वनडेमध्ये सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पाँटिंग, सनथ जयसूर्या, महेला जयवर्धने, इंझमाम उल हक, जॅक कॅलिस, सौरव गांगुली, राहुल द्रविड, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान आणि एम.एस. धोनी यांनी वनडेमध्ये १० हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. 


वनडेमध्ये १० हजार रन करणारे खेळाडू 


सचिन तेंडुलकर- १८,४२६ रन


कुमार संगकारा- १४,२३४ रन 


रिकी पाँटिंग- १३,७०४ रन 


सनथ जयसूर्या- १३,४३० रन 


महेला जयवर्धने- १२,६५० रन 


इंझमाम उल हक- ११,७३९ रन 


जॅक कॅलिस- ११,५७९ रन 


सौरव गांगुली- ११,३६३ रन 


राहुल द्रविड- १०,८८९ रन


ब्रायन लारा- १०,४०५ रन 


तिलकरत्ने दिलशान- १०,२९० 


एम.एस. धोनी- १०,१४३ रन