वीरेंद्र सेहवागच्या मते `हा` भारतीय क्रिकेटपटू मोडू शकतो सचिनचे विक्रम
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे.
मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे.
त्याच्या खेळातील सातत्य पाहून वीरेंद्र सेहवागने विराट्चे भरपूर कौतुक केले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये, विराटची स्तुती करताना तो सचिन तेंडूलकरचेही विक्रम मोडू शकतो. असे भाकित केले आहे. विराटचा सध्याचा फॉर्म पाहता आणि वय पाहता तो पुढील दहा वर्ष क्रिकेट खेळू शकतो. विराटच्या खेळात अशाप्रकारचे सातत्य राहिल्यास नक्कीच विराटही सचिनचे विक्रम मोडून पुढे जाऊ शकतो. असे सेहवाग म्हणाला.
सचिन तेंडूलकरसारखा फलंदाज पुन्हा क्रिकेटच्या खेळपट्टीवर दिसेल अशा आशा नव्हत्या, पण विराटच्या खेळाने हा गैरसमज दूर केला आहे. सध्या २८ वर्षांचा असणारा विराट पुढील दहा वर्षात अनेक गोष्टी बदलू शकतो. असे सेहवाग म्हणाला.
वन- डे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह पहिल्या स्थानी आहे. वन डेमध्ये विराट कोहलीने ३० शतकं ठोकली आहेत. या शतकांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. रिकी पाँटींग आणि कोहली हे सध्या संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहेत. विराट कोहलीचा सध्या फॉर्म पाहता तो आगामी काळात सचिनचा विक्रम मोडेल, अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे.