कोहलीने पकडलेल्या कॅचवर अंपायरचा अजब निर्णय, मॅचमध्ये मोठा वाद
अंपायरच्या निर्णयावरून पुन्हा वाद...पाहा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा आऊट की....
मुंबई: बंगळुरू टीमने राजस्थानवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. बंगळुरूचा हा दुसरा विजय आहे. आयपीएलमधील 13 वा सामना राजस्थान विरुद्ध बंगळुरू झाला. या सामन्यात बंगळुरूला विजय मिळवण्यात यश आलं. या सामन्यात अंपायरच्या एका निर्णयावरून मोठा वाद झाला.
सामन्यात हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. राजस्थान टीम फलंदाजीसाठी मैदानात उतरली. जयस्वाल 4 धावा करून बाद झाला. 10 व्या ओव्हरमध्ये देवदत्त पडिक्कल मैदानात उतरला. त्याने हर्षल पटेलच्या बॉलवर लाँग शॉर्ट मारला. कोहलीनं कॅच पकडला. हा कॅच खूप कठीण होता. मात्र कोहलीनं हा कॅच पकडून देवदत्तला आऊट केलं.
एका आऊटवरून सुपरड्रामा
या कॅचवरून आऊट की नॉटआऊट असे प्रश्न उपस्थित झाले. देवदत्त मैदानातून जात असताना त्याला अंपायरने परत बोलवून घेतलं. अंपायरला वाटलं की कॅच पकडताना विराट कोहलीच्या हातातील बॉल जमिनीला लागला. याशिवाय नो बॉल आहे की नाही हे देखील अंपायरला तपासून पाहायचं होतं.
विराट कोहली आणि संजू सॅमसन अंपायरसोबत बोलत असल्याचं मैदानात दिसले. अंपायरने हे सांगताच कोहली संतापल्याचं पाहायला मिळालं. यामुळे अंपायरच्या निर्णयावरून मैदानात पुन्हा एकदा वाद झाला.
राजस्थाननं पहिल्यांदा फलंदाजी करत 169 धावा केल्या. 170 धावांचं लक्ष्य बंगळुरूसमोर ठेवलं. देवदत्त पडिक्कलने 29 बॉलमध्ये 37 धावा केल्या. शिमरोन हेटमायरने 31 बॉलमध्ये 42 धावा केल्या. बंगळुरू टीमने राजस्थान टीमला पराभूत केलं. बंगळुरूचा दुसरा विजय तर राजस्थानचा पहिला पराभव आहे.