नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी ६ मे या दिवसाची सुरूवातच वाईट बातमीने झाली. विराट कोहलीचा कुत्रा ब्रुनो याचा मृत्यू झाला आहे. विराट कोहलीने ब्रुनोबाबत इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहिली आहे. बीगल जातीच्या या कुत्र्यावर विराटचं जीवापाड प्रेम होतं. एका मुलाखतीमध्येही विराटने ब्रुनो त्याचा लकी चार्म असल्याचं सांगितलं होतं. ब्रुनो आल्यानंतर टीम इंडियात माझं स्थान पक्क झाल्याचंही विराट म्हणाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आरआयपी माय ब्रुनो, तो आज चांगल्या ठिकाणी गेला. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो,' असं विराट त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाला. सोबतच विराटने ब्रुनोचा फोटोही शेयर केला आहे. विराटने बुधवारी ही पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांमध्येच त्याला लाखो रिएक्शनच मिळाल्या. 



२०१६ साली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विराट म्हणाला होता, 'ब्रुनोची उर्जा माझ्याएवढीच आहे. ब्रुनोलाही माझ्यासारखंच गाडीच्या खिडकीतून बाहेर बघायला आवडतं. तो माझ्यासाठी लकी चार्म आहे, कारण ब्रुनो माझ्या आजूबाजूला असताना मला शांत वाटतं.' 



विराट आणि ब्रुनोचा ११ वर्षांचा सहवास होता. ब्रुनोच्याआधी विराटने २ कुत्रे पाळले होते. सगळ्यात आधी आपल्याकडे पांढऱ्या रंगाचा पॉमेलियन कुत्रा होता, यानंतर मी गोल्डन लेब्राडोर कुत्रा घेतल्याचं विराटने सांगितलं होतं. लेब्राडोर कुत्र्याचं नाव विराटने रिको ठेवलं होतं. रिकोनंतर विराटने बीगल जातीच्या ब्रुनोला घरात आणलं होतं.