Indian Idol मधील या सिंगरच्या प्रेमात पडला विराट कोहली, इन्स्टाग्रामवर केलं फॉलो आणि मेसेज करत म्हणाला...
विराट कोहलीला क्रिकेट व्यतिरिक्त गाणी ऐकायला आवडतं. पंजाबी गाण्यांव्यतिरिक्त हिंदी गाणीही आवडीने ऐकतो. आता विराट कोहलीने सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडलमधील एका गायकाला पर्सनल मेसेज पाठवला आहे.
Virat Kohli Fan Of Indian Idol Singer Rishi Singh: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली टी 20 वर्ल्डकपसाठी संघासोबत ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांपासून विराट कोहलीला लय सापडत नव्हती. अखेर आशिया कपपासून विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली आहे. त्यामुळे विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विराट कोहलीला क्रिकेट व्यतिरिक्त गाणी ऐकायला आवडतं. पंजाबी गाण्यांव्यतिरिक्त हिंदी गाणीही आवडीने ऐकतो. आता विराट कोहलीने सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडलमधील एका गायकाला पर्सनल मेसेज पाठवला आहे. 13 व्या सीजमधील गायक ऋषी सिंहचा फॅन झाला आहे. ऋषी अयोध्येत राहणारा असून ऑडिशन राउंडमद्ये 'पहला पहला प्यार' आणि 'केसरिया तेरा इश्क' गाणं गात सर्वांची मनं जिंकली आहेत.
इंडियन आयडलचे काही भाग इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. यापैकी एका व्हिडीओत विराट कोहलीने ऋषीला मेसेज पाठवल्याचं दाखवलं आहे. कोहलीने त्याच्या आवाजाची स्तुती करत हा मेसेज पाठवला आहे. विराटने लिहिलं आहे की, "ऋषी तू कसा आहेस? मी तुझे काही व्हिडीओ पाहिले आहेत. तू खरंच छान आहे. मला तुझ्या आवाजातली गाणी ऐकणं आवडतं. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. असाच पुढे जात राहा. देव तुझ्यासोबत आहे." यावर ऋषीने विराट कोहलीचे आभार मानले आहेत.
आशिया कपमध्ये भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या होत्या. पाच सामन्यात 92 च्या सरासरीने 276 धावा केल्या होत्या. या स्पर्धेत एक शतकही ठोकलं होतं. त्यानंतर विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात 63 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नाबाद 49 धावांची खेळी केली होती.