बंगळूरु : चेन्नईविरुद्ध पराभवानंतर बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला दुसरा झटका बसलाय. चेन्नईविरुद्ध बुधवारी झालेल्या सामन्यात षटकांच्या धीम्या गतीप्रकरणी त्याला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. बंगळूरुने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ बाद २०५ धावा केल्या होत्या. मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ३४ चेंडूत ७० धावांची तुफानी खेळी करताना संघाला विजय मिळवून दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलने पत्रकार परिषदेत सांगितले, आयपीएलच्या आचारसंहितेनुसार षटकांची गती धीमी राखल्याप्रकरणी कोहलीला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येतोय. 


अंबाती रायडू(८२)  आणि मॅन ऑफ दी मॅच ठरलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी(नाबाद ७०) यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नई बंगळूरुवर पाच विकेट राखून विजय मिळवला. हा सामना फारच उत्कंठावर्धक ठरला. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना रंगला होता. कर्णधार धोनीने महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने आपल्या डावात अखेरच्या चेंडूवर षटकार मारत विजय मिळवून दिला. यावेळी वर्ल्डकपच्या अखेरच्या विजयी षटकाराची आठवण आली. 


अखेरच्या षटकांत १६ धावांची गरज


चेन्नईला विजयासाठी अखेरच्या षटकांत १६ धावांची गरज होती. ड्वाये ब्रावोने अखेरच्या षटकांत एक चौकार आणि एक षटकार लगावला. त्यानंतर एक धाव काढताना धोनीकडे स्ट्राईक दिला. धोनी चौथ्या चेंडूवर जोरदार षटकार लगावत विजयश्री खेचून आणली.