Virat Kohli Car: विराट कोहली (Virat Kohli) म्हणजे तरुणाईच्या गळ्यातील ताईट. फक्त भारतातच नाही तर जगभरात विराटचे फॅन्स त्याच्या मॅचची आतुरतेने वाट पाहत असतात. विराटचं डेली रुटीन काय? विराटची फॅनश (Virat Kohli fashion) स्टाईल, विराट कोणते कपडे घालतो? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेले असतात. अशातच आता विराटने एका मुलाखतीमध्ये (Virat Kohli Interview) त्याच्या पहिल्या गाडीविषयी खुलासा केला आहे.


विराटची पहिली गाडी कोणती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी माझ्या स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली पहिली कार (Virat Kohli First Car) सफारी होती. त्यावेळी सफारी ही गाडी असायची जी पाहून लोक स्वतःहून रस्ता मोकळा करायचे. सफारी (Virat Kohli Car) विकत घेण्यामागे ती प्रेरणा होती, ती कशी चालते किंवा तिला पुरेशी जागा आहे की नाही, याने फरक पडत नाही, असं विराट म्हणतो. आधी स्पोर्ट्स कार घेण्याची क्रेझ होती. आता कुटुंबासाठी एसयूव्हीसाठी जास्त प्राधान्य दिलं जातं, असंही विराट म्हणाला आहे.


पहिल्या गाडीचा किस्सा


त्यावेळी सफारीची फार क्रेझ होती. रस्त्यावर सफारी आली की लोक बाजूला व्हायचे. गाडी कशीये याचं काही घेणं देणं नसलं, लोक बाजूला होतात, मी मोठी गोष्ट होती. आम्ही पहिल्यांदा सफारी घेतली. तेव्हा मी आणि आमचा भाऊ गाडी घेऊन निघालो. जात असताना आम्ही पेट्रोल पंपावर गेलो. भावाने मोठ्या थाटात गाडीची टाकी फूल करायला सांगितली. थोड्या पुढं गेल्यावर गाड़ी हुंदक्या घेऊ लागली. तेव्हा आम्हाला कळालं भावाने डिझेलच्या गाडीत पेट्रोल भरून टाकी फुल केली होती, असा किस्सा सांगताना विराटला हसू अनावर झाले.


पाहा VIDEO -



दरम्यान, माझ्याकडून अनेक कार आवेगाने विकत घेतल्या गेल्या,त्यामध्ये मला गाडी चालवणं किंवा प्रवास करणं देखील कठीण होतं. मात्र, नंतर आपली चूक कळल्यानंतर गाड्या विकल्या. आता आम्ही फक्त त्याच गा़ड्या वापरतो जे आम्हाला आवश्यक आहे. आता आमच्याकडे तीन गाड्या असल्याचं विराटने सांगितलं. मला वाटतं की, हे मोठं होण्याचा आणि गोष्टींबद्दल अधिक जागरूक आणि परिपक्व होण्याचा देखील एक भाग आहे, असं म्हणत विराटने (Virat Kohli) युवा तरूणांना सल्ला देखील दिलाय.