नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या मैदानातील दमदार खेळासोबतच फिटनेससाठीही ओळखला जातो. विराटबाबत सांगितलं जातं की, तो आपली फिटनेस रूटीन नेहमीच फॉलो करतो. फिटनेसबाबत तो जराही निष्काळजीपणा करत नाही. या फिटनेससाठी विराट मेहनत करतो. सोबतच आपल्या डाएटचीही काळजी घेतो. टीमचे नवे कोच रवि शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली दोघेही टीम फिटनेसबाबत आग्रही आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने त्यांच्या फेसबुक पेजवर एक टीम इंडिया जिममध्ये सराव करत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात विराट कोहली, शिखर धवन, हार्दिक पांड्या, केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार हे फिटनेस कोचच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग घेत आहेत. 



बीसीसीआयने विराटच्या फिटनेसचा एक व्हिडिओ शेअर केलाय. यात विराट शंकर बासुसोबत वर्कआऊट करत आहेत. विराट फिटनेस योग्य राहण्यासाठी किती मेहनत घेतो हे या व्हिडिओत बघायला मिळतं. यामुळेच विराट फिटनेसच्या बाबतीत क्रिकेटच्या विश्वात सर्वात पुढे मानला जातो.