मुंबई : आयपीएलच्या पूर्ण  हंगामात कोहली खराब फॉर्ममध्ये खेळला मात्र शेवटच्या सामन्यात त्याने कमाल केली. 90 मिनिटांत सगळी मॅच पलटवली आहे. विराट कोहलीने शेवटच्या सामन्यात 73 धावा केल्या. आता बंगळुरू प्लेऑफर्यंत पोहोचणार की नाही याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली कायम मैदानात किंवा मैदानाबाहेर अॅक्टिव दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर थकवा नसतो. त्याच्या फिटनेस मागचं रहस्य नेमकं काय आहे. तो स्वत:ला कसं फिट ठेवतो आज जाणून घेऊया. 


विराट कोहली जीममध्ये वर्कआऊट करण्यावर भर देतो. तो जीम कधीच चुकवत नाही. कोरोनामुळे जेव्हा लॉकडाऊन लागला तेव्हाही विराटने घरी व्यायम केला. तो सोडला नाही किंवा त्यामध्ये आळस केला नाही. वेट लिफ्टिंगचा व्हिडीओ देखील त्याने चाहत्यांसोबत शेअर केला होता. 


जीममध्ये विराट कोहली स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजही करतो. यामध्ये पायांचा व्यायाम असतो. या व्यायामामुळे मांसपेशींना मजबूती मिळते. पायांना मजबूती मिळावी यासाठी विराट कोहली त्यावर खूप जास्त मेहनत घेतो. याचं कारण म्हणजे क्रिकेटमध्ये धावा काढण्यासाठी वेग महत्त्वाचा असतो. 


कठोर मेहनतीशिवाय काहीच शक्य नाही असं विराट कोहली नेहमी म्हणतो. वजन मेंटेन करण्यासाठी कोहली स्विमिंग करतो. पोटाची चर्बी कमी करण्यासाठी बेस्ट वाटर बेस्ट एक्सरसाइज करण्यावर भर असतो. 


कोहली आपल्या आहारात पौष्टिक गोष्टी खाण्याकडे विशेष लक्ष देतो. डाळ, हिरव्या भाज्या, पालक, अंड, बदाम, डोसा अशा हेल्दी डाएचा समावेश आहे. कोहलीला चायनीझ खायला आवडतं. याशिवाय कॉफी आणि प्रोटीन बार त्याचं फेव्हरेट आहे. मात्र तो जास्त हेल्दी खाण्याकडे लक्ष देतो.