मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार, रनमशीन विराट कोहली सध्या खराब फॉर्मपासून झूंजतोय. तब्बल अडिच वर्ष उलटून गेली आहेत मात्र तरीही अद्याप त्याला एकही सेंच्यूरी मारता आली नाहीय. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्य़ात आता सततच्या फ्लॉप परफॉर्मन्समुळे आता बीसीसीआयनेही विराटचा पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.त्यामुळे विराटच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या अनेक वर्षापासून विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम आहे. अनेक सामन्यात त्याला संधी देण्यात आली, मात्र या संधीचा तो फायदा घेऊ शकला नाही. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंड मालिकेत चांगली कामगिरी करणारे खेळाडू आगामी टी-20 विश्वचषक संघासाठी आपला दावा मजबूत करतील, पण या मालिकेत विराट कोहली आपल्या फॉर्ममध्ये परत येऊ शकेल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे.


इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका ही विराट कोहलीसाठी मोठी संधी असल्याचं मानलं जात आहे. विराट कोहली या मालिकेत चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरला तर टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी आहे.पण जर कोहलीचा फ्लॉप शो असाच सुरू राहिला तर भारतीय निवडकर्ते आगामी टी-२० विश्वचषकासाठी इतर पर्यायांचा विचार करू शकतात. 


यासंदर्भात बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोहली बराच काळ भारताकडून खेळत आहे. तो महान खेळाडू आहे यात शंका नाही, पण वारंवार फ्लॉप होणे ही धोक्याची घंटा आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की BCCI आता T20 वर्ल्ड कपसाठी विराट कोहलीचा पर्याय शोधत आहे.त्यामुळे विराट कोहलीसाठी इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. तो फ्लॉप ठरला तर कदाचित त्य़ाच्या पर्यायाचा विचारू करू शकेल.त्यामुळे आता इंग्लंडविरूद्धच्या सामन्यातील त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.