मोहाली : टीम इंडिया विरूद्ध श्रीलंका यांच्यात पहिला टी-20 सामना सुरु आहे. हा सामना माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खूप खास आहे. कारण विराटचा हा 100 टेस्ट सामना आहे. दरम्यान फलंदाजी करून फिल्डींगसाठी जेव्हा टीम इंडिया मैदानावर उतरली त्यावेळी कोहलीला सर्व खेळाडूंकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा पहिला डाव 574 रन्सवर घोषित करण्यात आला. यानंतर काहीवेळाने टीम इंडिया फिल्डींगसाठी मैदानात उतरली. टीम इंडिया जेव्हा मैदानात एंट्री घेत होती त्यावेळी सगळे खेळाडू एकमेकांसमोर उभे राहिले आणि विराटला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.



यावेळी विराट कोहलीनेही मैदानावर मजेत एंट्री घेतली. शिवाय त्याने सर्वांचे मानापासून आभार मानले. त्यानंतर विराट कोहलीने कर्णधार रोहित शर्माला टाळी देत मिठी मारली आणि धन्यवाद म्हटलं. विराट कोहलीला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आल्यानंतर मैदानात उत्साहाचं वातावरण पहायला मिळालं.


दरम्यान काल सामना सुरु होण्यापूर्वी मैदानावर विराट कोहलीसाठी खास सेरेमनी झाली. यावेळी टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी विराट कोहलीला टेस्ट कॅप देऊन सन्मान केला गेला. त्यावेळी विराटची पत्नी अनुष्का देखील त्याच्या सोबत होती.