IND vs WI : रोहित शर्माचं यश विराटला पचेना? हिटमॅनच्या अर्धशतकानंतर झालं असं की...!
Rohit Sharma : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पुन्हा फॉर्ममध्ये परतल्याने भारतीय चाहते प्रचंड खूश आहेत, मात्र टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली ( Virat Kohli ) फारसा खूश दिसला नाही.
Rohit Sharma : वेस्ट इंडिज विरूद्ध यांच्यात दुसरा टेस्ट सामना सुरु आहे. या सामन्यात रोहित शर्माने ( Rohit Sharma ) उत्तम खेळी करत 80 रन्स ठोकले. गेल्या सामन्यातही त्याने शतकी खेळी केली होती. दरम्यान रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पुन्हा फॉर्ममध्ये परतल्याने भारतीय चाहते प्रचंड खूश आहेत, मात्र टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली ( Virat Kohli ) फारसा खूश दिसला नाही. याचं कारण म्हणजे, ज्यावेळी रोहित शर्माने ( Rohit Sharma ) शतकी खेळी केली, त्यावेळी डगआऊटमधील सर्व खेळाडू खूश दिसले. मात्र विराट कोहली त्याठिकाणी दिसला नाही.
रोहित शर्माच्या अर्धशतकाने विराट नाखूश?
त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाची ओपनर जोडी यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्माने ( Rohit Sharma ) वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यावेळी रोहितने 143 बॉल्समध्ये 80 रन्सची खेळी केली.
रोहित शर्माने ( Rohit Sharma ) दुसऱ्या टेस्ट सामन्यात वेगवान खेळी केली. यावेळी त्याने 74 बॉल्समध्ये दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याची ही खेळी पाहून टीम इंडियातील सर्व खेळाडू खूश होऊन टाळ्या वाजवू शकले. मात्र यावेळी विराट कोहली ( Virat Kohli ) कुठेही दिसला नाही. यानंतर सोशल मीडियावर विविध-प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ लागले. यावेळी सोशल मीडियावर चाहत्यांनी रोहितचं हे यश विराटला रूचत नसल्याचं म्हटलं आहे.
रोहित शर्माने रचला इतिहास
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात 2000 रन्स करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याशिवाय टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद 2000 रन्स करणारा तो दुसरा ओपनर आहे. त्याने 40 डावात हा पराक्रम केलाय. विराट कोहली ( Virat Kohli ) हा टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे.