COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


Swiggy’s Discount Code : टी20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup) रविवारी झालेला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात ऐतिहासिक सामन्यांपैकी एक होता. रविवारी सामना जेव्हा भारताची बॅटिंग सुरु झाली आणि एक एक करत खेळाडू माघारी जात होते तेव्हा भारताचा विजयाची कुठलेही चिन्ह दिसतं नव्हते. पण म्हणतात ना हा खेळ आहे आणि त्याचा रोख कधीही बदलू शकतो. तो एक क्षण फक्त महत्त्वाचा असतो. शेवटच्या ओव्हरमध्ये 3 बॉल आणि 13 रन्सची गरज होती. तेव्हा विजयाचा शिल्पकार आणि कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) जो काही चमत्कार केला त्यानंतर भारतात रविवारी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली. 



स्विगीकडून भन्नाट ऑफर


पाकिस्तानवर विजय मिळाल्यानंतर भारतीय आनंद साजरा करत असताना स्विगीकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट ऑफर देण्यात आली. स्विगीची ही आयडिया सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. स्विगीकडून 'किंगकोहली82' ('KingKohli82') नावाचं हे कूपन तयार करण्यात आलं होतं. (Virat Kohli Heroics Against Pakistan Swiggy discount code nmp)



'किंगकोहली82'  व्हायरल 


स्विगीचं हे कूपन सोशल मीडिया प्लेटफॉर्म ट्विटरवर सोहिनी एम या यूजरने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने सुपर मार्केटिंग असं कॅप्शन दिलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. स्विगकडून ही ऑफर पहिल्या 40 हजार ग्राहकांसाठी होती. विजयानंतर स्विगीचे हे कूपन विराटच्या सुपरफास्ट रन प्रमाणे लगेचच संपलं.