मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना रविवारी मँचेस्टरध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या नजरा स्टार फलंदाज विराट कोहलीवर असतील. भारताने हा सामना जिंकला तर ते टीम इंडिया सिरीजंही जिंकेल. अशा स्थितीत कोहलीसाठी चांगली कामगिरी करणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यापूर्वी विराट कोहलीने एक खास पोस्ट केली आहे. विराट कोहलीने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोमध्ये लिहिलंय की, "What if I fall... Oh but my darling, what if you fly." यावरून कोहलीला आपल्या क्षमतेवर अजूनही विश्वास असल्याचे दिसून येतंय.


कोहलीचा फॉर्म चाहत्यांसाठी आणि टीमसाठी सध्या एक चिंतेचा विषय आहे. इंडियन प्रीमियर लीगदरम्यान क्रिकेट तज्ज्ञ विश्रांतीचा सल्ला देत असताना आता कोहलीवर विंडीज दौऱ्यावर विश्रांती घेतल्याबद्दल टीका होतेय. यावरून माजी भारतीय खेळाडूंनी, विश्रांती घेत असताना कोणीही फॉर्ममध्ये येत नाही, अशी टीकाही त्याच्यावर केलीये. 



दुसऱ्या वन डेमध्ये विराटचा पुन्हा फ्लॉप शो पाहायला मिळाला. त्यानंतर अनेक दिग्गजांनी त्याला टीममधून बाहेर बसवण्याची मागणीही केली आहे. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा विराट कोहलीच्या बाजूने त्याचा बचाव करण्यासाठी धावून आला. 


कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, विराट कोहलीला कोणत्याही आश्वासनाची गरज नाही. फॉर्ममध्ये खेळणं किंवा फ्लॉप होणं हे दोन्ही क्रिकेटच्या करिअरचा एक भाग आहेत. त्यामुळे इतकी वर्षे खेळणाऱ्या, इतक्या धावा केल्या अनेक सामनेही जिंकवले. आता कोहलीला बुस्ट करण्यासाठी एक किंवा दोन चांगल्या डावात खेळण्याची गरज आहे.