मुंबई : आपल्या जबरदस्त बॅटिंगच्या जोरावर विराट कोहलीने आपली एक ओळख निर्माण केली आहे. विराटचे भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. मात्र, केवळ खेळामुळेच नाही तर विराटच्या स्वभावामुळेही अनेकजण त्याच्यावर फिदा आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटच्या याच स्वभावाचा पुरावा समोर आला आहे. टीम इंडिया स्टेडिअममधून बाहेर पडत होती आणि त्याच वेळेस प्रेक्षक टीम इंडियाला चेअर्स करत होते. प्लेअर्स मैदानातून बाहेर पडत होते आणि चाहते त्यांना पाहत होते.


या प्रेक्षकांमध्ये अशी काही मुलं होती जे व्हील चेअरवर होती. या मुलांना पाहिल्यानंतर विराट भावूक झाला आणि त्यांच्याजवळ दाखल झाला.


विराट कोहलीने सर्व मुलांशी हस्तांदोलन केलं. तसेच सर्वांना आपला ऑटोग्राफही दिला. यावेळी विराटने सर्वांसोबत सेल्फीही काढला.


विराट कोहलीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आङे. ज्या वेळी टीम इंडिया एअरपोर्टकडे जात होती हा व्हिडिओ तेव्हा शूट करण्यात आला होता. विराट कोहलीने आपल्या सुरक्षारक्षकांना दूर करत थेट मुलांची भेट घेतली.



न्यूझीलंडसोबत झालेल्या टी-२० सीरिज दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदा टीम इंडियाने न्यूझीलंडचा टी-२० सीरिजमध्ये पराभव केला आहे.