नवी दिल्ली : फोर्ब्सने जगातील श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली असे एकमेव भारतीय नाव आहे जे जगभरातील टॉप १०० खेळाडूंमध्ये आहे. या यादीत कोहली ८९ व्या स्थानी आहे. फोर्ब्स यादीत 'द वर्ल्डाज हाइस्ट पेड एथलीट्स' नुसार  २८ वर्षाच्या कोहलीला २०१७ साली २२ मिलियन डॉलर मिळाले होते. यातील ३ मिलियन डॉलर पगार तर १९ मिलियन डॉलर एंडोर्समेंटच्या रुपात मिळाले. २०१७ मध्ये कोहलीने बंगळूरच्या टीमकडून खेळताना पगार आणि फिसचे मिळून १ मिलियन डॉलर कमावले. विराट कोहली हा आयपीएलमध्ये जास्त पैसे कमावणाऱ्यांपाकी एक आहे.


यांचीही नावे 


फॉर्ब्सच्या यादीत फुटबॉल खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोचे नाव नंबर एक वर आहे. गेल्यावर्षी त्याने एकूण ९३ मिलियन डॉलरची कमाई केली. दुसऱ्या नंबरवर बास्केट बॉल खेळाडू लिब्रोन जेम्स आहे ज्याने ८६.२ मिलियन डॉलर कमावले.