Virat Kohli WTC Final 2023: शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही, हे वाक्य आपण नेहमी ऐकत आलोय, सध्या या वाक्याची गरज पडलीये ती टीम इंडियाला. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत 469 धावांचा डोंगर उभारला. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाचे सुरूवातीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) खांद्यावर आता टीम इंडियाची जबाबदारी होती. रहाणेने झुंजार 89 धावांची खेळी केली. मात्र, दुसऱ्या दिवशी निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडियाचे फलंदाज खचले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाच्या सामन्यात खराब कामगिरी केल्याने विराट कोहली सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत होता. त्याला आता विराट कोहलीने प्रत्युत्तर दिलंय आणि टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये जोश जागवण्याचा प्रयत्न केला आहे. विराट कोहलीने (Virat Kohli Instagram Story) त्याच्या इन्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने महत्त्वाचा मॅसेज दिला आहे.


काय आहे मॅसेज?


You must develop the ability to be disliked in order to free yourself from the prison of other peoples' opinions


इतर लोकांच्या मतांच्या तुरुंगातून स्वत:ला मुक्त करण्यासाठी तुम्ही नापसंत होण्याची क्षमता विकसित केली पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे.


पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 469 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना इंडियाचा संघ फक्त 296 धावा करू शकला. दुसऱ्या डावात त्यामुळे कांगारूंनी 173 धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने पहिला गडी गमावला आहे. मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिलाय. 



आणखी वाचा - Ajinkya Rahane: मराठमोळा अजिंक्य एकटा कांगारूंना भिडला; शतक हुकलं पण रचला इतिहास!


दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final 2023) अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या बॅटने पुन्हा एकदा निराशा केली. अवघ्या 14 धावा करून कोहली तंबूत परतला. विराट आऊट होताच संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली होती. कोहली (Virat Kohli) बाद झाल्यानंतर संपूर्ण ऑस्ट्रेलियाच्या टीमने जल्लोष सुरू केला. विराटच्या विकेटचं महत्त्व ऑस्ट्रेलियाला माहिती होतं. त्यानंतर आता दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.