इस्लामाबाद : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की तोच क्रिकेटचा सध्याचा शानदार बॅट्समन आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकामागोमाग एक रेकॉर्ड मोडत विराट पुढे चालला आहे. विराटचे जगभरात अनेक फॅन्स आहेत. विशेष म्हणजे त्याच्या चाहत्यांच्या यादीत अनेक परदेशी क्रिकेटर्स देखील आहेत. या यादीत आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद यांचं. जावेद मियादाद यांने विराट कोहलीचं कौतूक केलं आहे.


विराटचं कौतूक


विराट हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरोधातील तिस-या एकदिवसीय सामन्यात 34वं शतक ठोकलं. त्याच्या या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने तिसरा सामना पण जिंकला.


विराटचा आणखी एक फॅन


एका मुलाखतीत जावेद मियांदाद यांनी म्हटलं की 'विराट कोहलीचं खेळण्याचं तंत्र आणि भारताला कठीण परिस्थितीतूनही विजयाकडे घेऊन जाण्याची कला त्याला एक महान फलंदाज बनवतं. विराट कोहलीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्याच्या खेळण्याच्या पद्दतीमुळेच तो फक्त काही सामन्यांपुरता नाही तर प्रत्येक वेळी धावा करण्यात यशस्वी ठरतो'.


'समोरील गोलंदाजाचं सामर्थ्य आणि कमतरता पाहून आपल्या बॅटींगमध्ये तो बदल करतो हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे' असं जावेद मियांदाद यांनी म्हटलंय.