मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड शेवटचा कसोटी सामना स्थगित झाला. त्यानंतर IPL सामने सुरू झाले आहेत. हे सामने संपतात तोच लगेच T 20 World cup सामने सुरू होणार आहेत. WTC हातून गेल्यानंतर आता T20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला नियोजन करायचं आहे. सर्वांच्या नजरा याकडे लागल्या आहेत. T20 फॉरमॅट हे कोहलीसाठी कर्णधार म्हणून शेवटचं असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीनं यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली होती. टी 20 फॉरमॅटमधून विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. T20 World Cup हा कर्णधार म्हणून त्याचा शेवटचा असेल असंही त्याने म्हटलं होतं. टी 20 वर्ल्ड कपआधी विराट कोहलीसमोर मुंबई इंडियन्स संघातील दोन खेळाडूंनी एक मोठं संकट उभं केलं आहे. 


 IPL दरम्यान मुंबई इंडियन्स संघाने आता विराट कोहलीचं टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे विराट कोहली संकटात सापडला आहे. आयपीएलमध्ये मुंबई संघाकडून रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या खेळत आहेत. हे दोघंही जखमी होते. टी 20 वर्ल्ड कपसाठी खेळणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीत कोणतीही जोखीम आयपीएलमध्ये उचलू नये असं BCCIच्या अधिकाऱ्यांकडून विराटला बजावण्यात आलं होतं. 


हार्दिक पांड्या जखमी असताना तो पूर्ण रिकव्हर होण्यापूर्वीच त्याला मुंबई इंडियन्सने खेळायला उतरवलं आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे आता विराट कोहलीचं टेन्शन वाढलं आहे. मुंबई इंडियन्स संघासाठी जसं हार्दिक पांड्या फिट राहाणं गरजेचं आहे. तसंच टी 20 वर्ल्ड कपसाठी हार्दिक पांड्या महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे आता विराट कोहलीचं टेन्शन या आयपीएलनं वाढवलं आहे. 


हार्दिक पांड्या अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. त्याच्या फिटनेसबाबत चिंता असतानाही तो मैदानात उतरला आहे. त्यामुळे टी 20 वर्ल्ड कपसंदर्भात आता काय होणार हे पाहावं लागणार आहे.