केपटाउन : तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीने 160 रन्सची शानदार खेळी केली. पण या खेळीकडे बारकाईने पाहिल्यास यामध्येही तुम्हाला एक रेकॉर्ड झालेला दिसेल. जाणून घेवूया काय होता हा रेकॉर्डय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहलीने या सीरीजमध्ये दुसरं शतक ठोकलं. यासोबतच त्याने वन-डे करिअरमधलं ३४ वं शतक पूर्ण केलं. कोहलीने त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड बनवले आहेत.


विराट १५९ बॉल्समध्ये १६० रन्सची खेळी केली. यामध्ये १२ फोर आणि २ सिक्सर्सचा समावेश होता. म्हणजेच १०० रन्स त्याने धावून पूर्ण केले.


याचा अर्थ कोहलीने फोर-सिक्सचा आधार न घेता शतक पूर्ण केलयं. असा कारनामा करणारा तो पहिला भारतीय बॅट्समन आहे.


गांगुलीने धावले ९८ रन्स 


याआधी १९९ मध्ये सौरव गांगुलीने श्रीलंकेविरुद्ध १३० रन्सचा खेळ केला. यामध्ये ९८ रन्स हे धावून पूर्ण केले.


गॅरीचे ११२ रन्स 


साऊथ आफ्रिकेचा माजी फलंदाज गॅरी कर्सटनच्यानावेही असाच एक रेकॉर्ड आहे. १९९६ वर्ल्ड कपमध्ये यूएईविरुद्ध १८८ रन्सची खेळी त्याने केली. यामध्ये ११२ रन्स त्याने धावून काढले.


हे पाच 'विराट' रेकॉर्ड


१. दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर बायलेट्ररल सीरीजमध्ये कर्णधार म्हणून विराट सर्वात जास्त शतक लगावणारा खेळाडू बनला आहे.


२. एक खेळाडू म्हणून आफ्रिकेमध्ये विराट चौथा खेळाडू आहे ज्याने एका सीरीजमध्ये एकापेक्षा अधिक शतक ठोकले आहेत. हा रेकॉर्ड आतापर्यंत केविन पीटरसनच्या नावावर होता.


त्याने 2005 मध्ये आफ्रिकेमध्ये 3 वनडे शतक ठोकले होते.


त्याच्या शिवाय जो रूटने 2016 मध्ये डेविड वॉर्नर 2016 मध्ये आणि 2018 मध्ये विराट कोहलीने एका पेक्षा अधिक शतक केले आहेत.


३. कर्णधार म्हणून सर्वात अधिक शतक ठोकणारा विराट कोहली पहिला खेळाडू बनला आहे. त्याने सौरव गांगुलीला मागे टाकलं आहे.


गांगुलीने १४३ इनिंगमध्ये ११ शतक ठोकले. विराटने कर्णधार म्हणून ४३ इनिंगमध्ये १२ शतक ठोकले आहेत.


४. दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक शतक ठोकण्याच्या बाबतीत सर्वात जास्त शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.


विराट पेक्षा अधिक शतक सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. या गोघांनी आफ्रिकेत ५-५ शतक ठोकले आहे.


५. कोहली दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी सौरव गांगुलीने १२७ रनची खेळी केली होती.