एडिलेट : भारताने ऑस्ट्रेलियाला 31 रन्सने मात देत नवा इतिहास रचला. न्यूझीलंड, इंग्लंड अशा दिग्गज संघांना धूळ चारल्यानंतर टीम इंडियाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. टेस्ट क्रिकेटमध्ये  नंबर वन असणाऱ्या कॅप्टन विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघ ऑस्ट्रेलियात गेलाय.  1947-48 उभयतांत झालेल्या सामन्यानंतर 71 वर्षांनी पहिल्यांदाच कांगारूंना त्यांच्या भूमीत हरवण्याचा भीमपराक्रम कोहलीच्या नेतृत्वाखाली झालाय. अर्थात, कोहलीच्या नेतृत्वाकडे पुन्हा एकदा साऱ्या जगाच्या नजरा वळल्या आहेत. 


जलद हजार रन्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एडिलेट टेस्टच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहलीने 34 रन्सची खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या भूमीत आपल्या हजार धावा पूर्ण केल्या.


ऑस्ट्रेलियाच्या पिचवर हजार रन्स पूर्ण करणारा कोहली हा 28 वा बॅट्समन ठरलाय. हा रेकॉर्ड त्याने 59.05 च्या सरासरीने केलाय हे ही तितकंच महत्त्वाचं आहे.


आतापर्यंत ऑस्ट्रेलियात हजार रन्स पूर्ण करणाऱ्यांनी धावसंख्येचा रनरेट याहून कमी होता.


गेल्या 50 वर्षात या सरासरीने हजार रन्स पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज ठरला.


पाचव्या स्थानी 


दुसऱ्या डावात 5 रन्स करुन ऑस्ट्रेलियात सर्वात जलद हजार रन्स पूर्ण करण्याचा रेकॉर्डही कोहलीने आपल्यानावे केलाय. त्याने केवळ 18 डावात ही धावसंख्या उभारत सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना मागे टाकलंय.


ऑस्ट्रेलिया विरूद्ध त्यांच्याच भूमीवर सचिन तेंडुलकर (1,809) , व्ही.व्ही.एस लक्ष्मण (1,236), राहुल द्रविड (1,143), विरेंद्र सेहवाग (1,031) यांच्या रांगेत आत1,029) पाचव्या स्थानी जाऊन बसलाय.


ऑस्ट्रेलियाच्या भूमीत कमी डावांमध्ये हजार रन्स पूर्ण करणारा कोहली हा पहिला आशियाई फलंदाज ठरलाय.


विराटच्या आधी व्हीव्हीएस लक्ष्मण 19, सचिन तेंडुलकर 22,  विरेंद्र सेहवाग 22, राहुल द्रविड 25, जहीर अब्बास 26, जावेद मियॉंदाद 28 डावात हजार रन्स पूर्ण केले आहेत.