मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली एका मोठ्या जागतिक विक्रमापासून केवळ ३७ रन दूर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवान २० हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ ३७ धावांची गरज आहे. विश्वचषकात त्यानं नुकत्यात वेगवान ११ हजार एकदिवसीय धावांच्या विक्रमाची नोंद केली. कोहलीच्या नावावर सध्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये १९ हजार९६३ धावा आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजविरुद्ध जर त्यानं ३७ धावा केल्या तर २० हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो १२ खेळाडू आणि तिसरा भारतीय खेळाडू ठरणार आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडनं २० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. कोहलीच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये ११ हजार ८७, कसोटीमध्ये ६ हजार ६१३ आणि टी-२० मध्ये २ हजार २६३ धावा आहेत. सचिन आणि लारानं ४५३ डावांमध्ये २० हजारांचा टप्पा गाठला होता. तर कोहलीनं आतापर्यंत ४१६ डावांमध्ये १९ हजार ९६३ धावा केल्या आहेत.


टीम इंडिया यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत आहे. विराटच्या टीमने आतापर्यंत ४ मॅच जिंकल्या आहेत, तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली. टीम इंडियाची वर्ल्ड कपमध्ये बॅटिंगसोबत बॉलिंगही चांगली होत आहे.