Virat Kohli: सध्या इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यामध्ये 5 सामन्यांची सिरीज सुरु आहे. यामध्ये दुसरा सामना विशाखापट्टणममध्ये शुक्रवारपासून सुरु झाला आहे. इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये विराट कोहलीचा समावेश आला होता. मात्र त्याने अचानक काही वैयक्तिक कारणामुळे दोन्ही टेस्टमधून माघार घेतल्याचं समोर आलं. यावेळी विराटबाबत अनेक अफवा समोर आल्या. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार विराटने त्याच्या आईसाठी ब्रेक घेतल्याचं समोर आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 28 रन्सने पराभव झाला. विराट कोहली या भारतीय टीमचा भाग नव्हता. विराटने इंग्लंडविरूद्धची सिरीज सुरू होण्यापूर्वी सामन्यांमधून आपलं नाव काढून घेतलं होतं. विराट कोहलीने नाव का मागे घेतलं हे स्पष्ट झालं नव्हतं. यावेळी अनुष्का शर्मामुळे विराटने माघार घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. 


विराट कोहलीने का माघार घेतली


अनुष्का शर्मामुळे विराट कोहलीने इंग्लंडविरूद्धच्या टेस्टमधून आपलं नाव मागे घेतल्याचं समोर आलं होतं. सोशल मीडियावरून असा दावा केला जात आहे. मात्र, त्यावेळी विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या 2 कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही, असे सांगण्यात आलं. मात्र विराट कोहली न खेळण्यास अनुष्का शर्मा जबाबदार आहे का? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? 


विराट कोहलीचं नाव मागे घेण्याचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरीही विराट कोहलीची आई सरोजा कोहली आजारी असल्याचं समजतंय. 


विराट कोहलीच्या आईची तब्येत बरी नाही


सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीची आई सरोजा कोहली यांना गेल्या सप्टेंबरपासून यकृताचा त्रास होता. त्यानंतर सरोजा कोहलीवर गुरुग्राममधील सीके बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र असं असतानाही विराट कोहलीने वनडे वर्ल्डकप खेळण्याचा निर्णय घेतला. 


सध्या सरोज कोहली यांची प्रकृती फारशी चांगली नाहीये. त्यामुळे विराट कोहलीने आईसोबत राहण्यासाठी आपलं नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान वृत्तावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.