लंडन :  सेमीफायनलमध्ये बांगलादेशला कमी लेखून चालणार नसल्याचे विधान भारताचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत केलेय. भारताचा उद्या बांगलादेशविरुद्ध सामना रंगतोय. या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला, बांगलादेश संघ सध्या चांगली कामगिरी करतोय. जबाबदारी घेण्यासारखे त्यांच्याकडे खेळाडू आहेत. मात्र धक्कादायक निकालाची नोंद करणारा म्हणून बांगलादेशला ओळखले जाते. ते सामन्यातील बाजी कधी पलटवतील हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखून चालणार नाही.


चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी सामन्यात भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेला हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारताला श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला. 


तर दुसरीकडे बांगलादेशने न्यूझीलंडला हरवले. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना रद्द झाला. इंग्लंडविरुद्ध त्यांना पराभव सहन करावा लागला.