मुंबई : विराट कोहली जेव्हा मैदानावर असतो तेव्हा प्रत्येक बॉलर दहशतीमध्ये असतो. विराटला आऊट केल्याशिवाय विजय नाही हे प्रत्येक संघाच्या कर्णधाराला आज माहितीये. भारताचा कर्णधार विराट कोहली जगभरात टॉप फलंदाजांच्या यादीत येतो. आयसीसीने टेस्ट रँकिंग घोषित केली आहे. आयसीसीच्या या यादीत टेस्ट रँकिंगमध्ये कर्णधार विराट कोहली दूसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट तिसऱ्या स्थानावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेडिंग्लेमध्ये खेळल्या गेलेल्या टेस्ट मॅचमध्ये शानदार प्रदर्शन करणारा पाकिस्तानच्या विरोधात टीमला विजय मिळवून देणारा इंग्लंडचा बॉलर क्रिस वोक्स आणि स्टुअर्ड ब्रॉडला टेस्ट रँकिंगमध्ये फायदा झाला आहे.


टेस्ट रँकिंगमध्ये बॉलर्सच्या यादीत दोन स्थानांचा तर वोक्सला एका स्थानाचा फायदा झाला आहे. ब्रॉड आता 12व्या स्थानावर आहे तर वोक्स 34व्या स्थानावर आहे. इंग्लंडने दूसऱ्या टेस्ट मॅचमध्ये पाकिस्तानला एक इनिंग आणि 55 रनने मात देत सीरीज 1-1 ने बरोबर केली.