T20 World Cup : सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण मोडणार? Team India तील 2 स्टार खेळांडूमध्ये स्पर्धा
IND vs BAN: श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने (Sri Lanka Mahela Jayawardene) गेल्या 8 वर्षांपासून टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राज्य करत आहे, परंतु यावर्षी त्याचा विक्रम एक नव्हे तर दोन भारतीय फलंदाज मोडू शकतात.
India vs Bangladesh, T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलचं तिकीट पक्क करायला टीम इंडियाला (Team India)आजची मॅच जिंकणं गरजेचं आहे. T20 World Cup 2022 मध्ये भारताने आतापर्यंत 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज बांगलादेशवर (Bangladesh) विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. दुपारी 1 वाजता नाणेफेक होणार असून दुपारी 1:30 वाजता मॅच सुरु होणार आहे. आजची मॅच टीम इंडियातील दोन खेळांडूसाठी महत्त्वाची आहे.
Virat Kohli or Rohit Sharma :
श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने (Sri Lanka Mahela Jayawardene) गेल्या 8 वर्षांपासून टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राज्य करत आहे, परंतु यावर्षी त्याचा विक्रम एक नव्हे तर दोन भारतीय फलंदाज मोडू शकतात. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहलीबद्दल (Virat Kohli) आम्ही बोलत आहोत. कोहली या स्पर्धेत आतापर्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. त्याने नेदरलँड विरुद्धच्या मागील सामन्यात नाबाद 62 धावांची खेळी केली, पाकिस्तान विरुद्ध 82 धावांची जादुई खेळी खेळली, या सामन्यात रोहित शर्माची बॅटही चांगलेच तळपली आणि भारतीय कर्णधाराने 50 धावांचा टप्पाही पार केला.
यासह विराट कोहलीच्या नावावर टी-20 वर्ल्ड कपमध्ये 989 धावा झाल्या आहेत, तर रोहित शर्माच्या नावावर 904 धावा आहेत. हे दोन्ही भारतीय फलंदाज अनुक्रमे दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. (virat kohli or rohit sharma most runs t20 world cup 2022 India vs Bangladesh nmp)
आज जर किंग कोहलीने 11 धावा केल्या तर तो T20 विश्वचषकात 1000 धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज बनेल, तर 28 धावा करत तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम करेल. कोहलीचा फॉर्म पाहता तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे काम करेल असं दिसतं कारण यंदाच्या विश्वचषकात त्याला कोणीही बाहेर काढू शकलं नाही.
दुसरीकडे, जर आपण रोहित शर्माबद्दल बोललो तर, 904 धावांसह चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय कर्णधाराने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 62 धावा केल्या तर तो या यादीत ख्रिस गेल (965) ला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर जाईल.
टी-20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजावर कोहली प्रथम आपलं नाव कोरेल, अशी अपेक्षा आहे, तर रोहितच्या बॅट तळपली काढल्यास तो यावर्षी कोहलीलाही मागे टाकू शकतो.