मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या फॉर्मपासून झूंजतोय. इग्लंड विरूद्धच्या कसोटी सामन्यातही त्याला खास कामगिरी करता आली नाहीये. शेवटच शतक विराटने 2019 ला ठोकल होत त्यानंतर आता अडिच वर्ष पुर्ण होत आली आहेत, मात्र त्याच्या बॅटीतून एकही शतक आलं नाही आहे. त्यामुळे विराटच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

954 दिवसांचा दुष्काळ
इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यातही विराटची बॅट चालली नाही आहे.त्याने पहिल्य़ा डावात 11 तर दुसऱ्या डावात 20 धावा केल्या आहेत. या सामन्यातही त्याला शतक झळकावता न आल्याने कोहलीच्या शतकांचा हा दुष्काळ वाढतचं चालला आहे.शतकांचा हा दुष्काळ आता काही दिवस किंवा महिन्यांचा नाही तर अडीच वर्षांपासून सुरूच आहे. दिवसांत मोजले तर कोहलीला ९५४ दिवसांपासून (३ जुलैपर्यंत) शतक करता आलेले नाही.आता हे किती काळ टिकेल हे सांगणेही कठीण आहे.


2019 ला शेवटचे शतक
विराट कोहलीचे शेवटचे शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध ठोकलं होते. त्यानंतर टीम इंडिया 22 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटी खेळली. यामध्ये कोहलीने 136 धावांची खेळी केली. भारताने तीन दिवसांत ही कसोटी जिंकली.


इतक्या सामन्यात अपयश
2019 पासून ते आता पर्यत कोहलीने 18 कसोटी, 21 एकदिवसीय आणि 25 टी-20 सामने खेळले आहेत. मात्र त्याला एकही शतक झळकावता आले नाही.


डिसेंबर 2019 पासून आतापर्यंतचा विक्रम 
एकूण आंतरराष्ट्रीय सामने: 64 -धावा  2509  - अर्धशतक 24
कसोटी: 18 - धावा 872   - अर्धशतक 6
एकदिवसीय: 21 -  धावा 791  - अर्धशतके 10 
T20: 25 -  धावा 846 - 8 अर्धशतक


दरम्यान विराट कोहलीचा खराब फॉर्म आगामी टी 20 विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून चिंतेचा विषय आहे. त्यातच इतक्या दिवसांत अपय़शी कामगिरीमुळे त्याच्या जागी इतक खेळाडूला संधी देता आली असती. त्यामुळे त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतेय.