विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर फॅन्सची मारामारी आणि तोडफोड, गेट समोर चपलांचा खच

Virat Kohli Ranji Trophy : स्टेडियममध्ये पोहोचण्यासाठी गेट बाहेर मोठी चेंगराचेंगरी झाली यात अनेक फॅन्स जखमी झाले तर स्टेडियम परिसरातील सामानाची नासधूस सुद्धा झाली.
Ranji Trophy 2025 : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) 13 वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करत आहे. गुरुवारी दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यात रणजी ट्रॉफी (Ranji Trophy ) सामन्याला सुरुवात झाली असून विराटची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षकांनी स्टेडियमवर हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली आहे. सकाळी सामना सुरु होण्यापूर्वी विराटच्या फॅन्सनि स्टेडियमबाहेर मोठी गर्दी केली होती. मग स्टेडियममध्ये पोहोचण्यासाठी गेट बाहेर मोठी चेंगराचेंगरी झाली यात अनेक फॅन्स जखमी झाले तर स्टेडियम परिसरातील सामानाची नासधूस सुद्धा झाली. सध्या याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.
गेट क्रमांक 16 च्या बाहेर उडाली झुंबड :
विराट कोहलीला रणजी सामन्यात खेळताना पाहण्यासाठी अनेक फॅन्स पहाटे ३ वाजल्यापासूनच स्टेडियमबाहेर पोहचू लागले होते. सकाळी स्टेडियमचा गेट खुला करण्यात आला तेव्हा आत जाण्यासाठी उत्सुक असलेल्या फॅन्समध्ये चेंगराचेंगरी झाली. गेट क्रमांक 16 च्या बाहेर चेंगराचेंगरीत काही फॅन्स जखमी झाले. अनेकजण धक्काबुक्की झाल्याने एकमेकांवर कोसळले. काहींच्या चपला हरवल्या. चेंगराचेंगरीनंतर गेट समोर चपलांचा खच पडला होता. जखमी झालेल्या चाहत्यांवर पोलीस आणि स्टेडियमच्या सुरक्षा रक्षकांनीच प्रथमोपचार केले. पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यात काही पोलिसांना देखील किरकोळ जखमा झाल्या. DDCA चे सचिव अशोक कुमार शर्मा यांनी सांगितले की दिल्ली विरुद्ध रेल्वे हा रणजी ट्रॉफी सामना पाहण्यासाठी पहिल्या दिवशी जवळपास 10 हजार प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडीओ :
विराटचं रणजी ट्रॉफी करिअर :
विराटने शेवटचा सामना 2012 मध्ये गाजियाबाद उत्तर प्रदेशच्या संघाविरुद्ध खेळला होता. विराट अनेक वर्षांनी देशांतर्गत क्रिकेट सामना खेळणार असल्याने त्याचे चाहते विराटची फलंदाजी पाहण्यासाठी उत्सुक आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत रणजी ट्रॉफीमध्ये एकूण 23 सामने खेळले असून या सामन्यांमध्ये 50.77 च्या सरासरीने 1574 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 5 शतक देखील लगावली आहेत.
रेल्वे संघाची प्लेईंग 11 :
अंचित यादव, विवेक सिंह, सूरज आहूजा (कर्णधार), उपेन्द्र यादव (विकेटकीपर), मोहम्मद सैफ, भार्गव मेराई, कर्ण शर्मा, राहुल शर्मा, हिमांशु सांगवान, अयान चौधर, कुणाल यादव
दिल्ली संघाची प्लेईंग 11 :
अर्पित राणा, सनत सांगवान, विराट कोहली, यश ढुल, आयुष बदोनी (कर्णधार), प्रणव राजवंशी (विकेटकीपर), सुमित माथुर, शिवम शर्मा, नवदीप सैनी, मनी ग्रेवाल, सिद्धांत शर्मा